रत्नागिरीत गडनदीच्या धरणाच्या बोगद्याचा दरवाजा तुटला

August 29, 2012 9:40 AM0 commentsViews: 13

29 ऑगस्ट

रत्नागिरीतल्या गडनदीच्या धरणाच्या बोगद्याचा दरवाजा तुटल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर येत आहे. सुमारे 50 ते 60 फूट उंचीचे पाण्याचे लोट वेगाने बाहेर पडत आहेत. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या 6 गावांना धोका निर्माण झाला आहे. अतिशय वेगाने हे पाणी गड नदी पात्रात मिसळतंय. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मात्र पाण्यामुळे कोणत्याची प्रकारचा धोका नसल्याचे सांगितलं आहे. बोगद्याच्या दरवाजाला लिकेज होती. संततधार पावसामुळे पाण्याचा दाब वाढल्याने दरवाजा तुटला. आणि प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर पडू लागले आहे.

close