संसदेचं कामकाज 30 तारखेपर्यंत तहकूब

August 28, 2012 11:36 AM0 commentsViews: 11

28 ऑगस्ट

सलग सहाव्या दिवशीही संसदेतली कोंडी कायम आहे. आज सहाव्या दिवशीही विरोधकांनी कामकाज होऊ दिलं नाही. आज सकाळपासून दोनवेळा संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आता संसदेचं कामकाज 30 तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. दरम्यान, सरकारने ही कोंडी फोडण्यासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि शहानवाज हुसेन यांच्याशी चर्चा केली पण तोडगा निघाली नाही. तर सुषमा स्वराज यांनी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांचीही भेट घेतली.

close