विजयकुमार,योगेश्वरला खेलरत्न तर युवीला अर्जुन पुरस्कार

August 29, 2012 1:46 PM0 commentsViews: 21

29 ऑगस्ट

भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणार्‍या खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांचं आज वितरण करण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवणारा नेमबाज विजय कुमार आणि ब्राँझ मेडल विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 25 खेळाडंूना अर्जुन पुरस्कार देण्यात आले. कॅन्सरच्या आजारपणातून तंदुरुस्त होऊन क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या युवराज सिंगचा यामध्ये समावेश आहे. तसेच महाराष्ट्राची धावपटू कविता राऊत आणि कुस्तीपटू नरसिंग यादव याचाही अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतीय बॉक्सिंग टीमध्ये कोच बी आय फर्नांडिस यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान केला गेला. फर्नांडिस हे क्युबाचे आहेत आणि यंदा प्रथमच परदेशी कोचला हा सन्मान मिळाला.

close