अल्पवयीन मुला-मुलींच्या’दारु पार्टी’चा पर्दाफाश

August 28, 2012 12:09 PM0 commentsViews: 61

28 ऑगस्ट

पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये 10 वी आणि 11 वीच्या अल्पवयीन मुला-मुलींच्या 'दारु पार्टी'चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुलांच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत मुंढवा भागातील रिव्हर व्ह्यू हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात 800 मुलं मुली दारुच्या धुंदीत आढळून आले. पोलिसांना काही मुला मुलींना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल आणि पार्टी आयोजकावर खटले दाखल केले आहे. विशेष म्हणजे या पार्टीचे आयोजन फेसबुक आणि ब्लॅकबेरी मेसेंजरच्या माध्यमातून करण्यात आले होते.

गेल्या शनिवारी म्हणजे 25 ऑगस्टला पुण्यातील मुंढवा रोडवरील एका आलिशान हॉटेलात दुपारी 2 वाजता या पार्टीचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे मुलं मद्यप्राशनासह नशेखोरीच्या आहारी गेली आहेत. वेगवेगळ्या पाटर्‌यांना जाण्याकरता घरा़त हट्ट करतात. पालकांनी अटकाव केला तर घरातील टीव्ही, लॅपटॉप फोडतात. ब्लेडने हातावर जखमा करुन घेतात अशा तक्रारी पालकांनीच पोलिसांच्या कानावर घालून मदतीची याचना केली. मग पोलीसांनी पालकांच्या मदतीने मुलांच्या ब्लॅकबेरी मेसेंजर- फेसबुकवर निमंत्रण आलेल्या एका पार्टीचा छडा लावला.

पोलिसांनी हॉटेलमधे प्रवेश केल्यावर 800 ते 90 मुलं-मुली स्विमिंग पुलमध्ये डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते. 80 टक्के मुलं-मुली 10 वी 11वी इयत्तांमधली अर्थात 18 वयाच्या आत असल्याने कारवाईला मर्यादा होत्या. पोलिसांनी 20 ते 22 वयाच्या मुलांना ताब्यात गेतलं. जे शुध्दीत होते त्यांना घरी पाठवलं. पार्टी ऑर्गनायजरने मुलींना मोफत प्रवेश ठेवला होता तर मुलांना 400 रूपये फी ठेवली होती. हॅपी आवर्स मध्ये दारू अर्ध्या किमतीला देण्यात येत होती. तर 'ब्लॅडर फुल ब्लास्ट' अर्थात लघवी होईपर्यंत दारू फुकट देण्यात येत होती. पोलिसांनी संयोजकांवर खटले दाखल केले आहे. न्यायालयाने त्यांना 1200 रूपये दंड ठोठावला तर सार्वजनिक जागी सिगारेट फुंकणार्‍या सहा मुला मुलींना 700 रूपये दंड ठोठावला आहे.

पुणे पोलिसांनी आता सोशल नेटवकीर्ंग साईट्सवर वॉच ठेवण्यासोबतच शाळांमध्ये जागृती करण्याचं ठरवलं आहे. 10 वी- 11 वी म्हणजे करीअर घडवण्याचं वय…पण या कोवळ्या वयात दारू तसेच इतर नशेखोरीच्या आहारी नवी पिढी जाऊ नये याकरता समाजातील सर्वच घटकांनी एकत्र यायची गरज आहे अशी धोक्याची घंटा या घटनेनं अधोरेखीत केली आहे.

close