पुण्यात मोठा शस्त्रसाठा जप्त, दोघांना अटक

August 29, 2012 2:31 PM0 commentsViews: 2

29 ऑगस्ट

पुण्यात आज पोलिसांनी आज मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यात नऊ बंदुका, 76 काडतुसं, 2 देशी बनावटीची रिव्हॉल्वर, 2 गावठी कट्टे, आणि पाच पिस्तुलं सापडली आहेत. याप्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोहनसिंग उर्फ बल्ली मेहरसिंग रामगडीया आणि बाळा शिंदे अशी त्यांची नावं आहेत. हडपसर भागातील सातववाडी रोडवरील मेहसिंग रामगडीयार आणि बाळा शिंदे या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या दोघांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आर्म ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

close