5 हजार लोकांना मारण्याचा अतिरेक्यांचा कट होता – उपमुख्यमंत्री

November 29, 2008 1:10 PM0 commentsViews: 1

29 नोव्हेंबर, मुंबई मुंबईत शिरलेल्या दहशतवाद्यांचा कट पाच हजार लोकांना जीवे मारण्याचा होता, असा धक्कादायक खुलासा उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ' अतिरेक्यांचा कट 10 हजार लोकांना जीवे मारण्याचा होता. हा कट लक्षात घेतला तरी किती शस्त्रसाठा त्यांनी बरोबर आणला असेल ? महाराष्ट्र पोलीस आणि एनएसजीच्या कंमाडोजनी हा कट उधळवून लावला ' असं आर. आर.पाटील यांनी सांगितलं. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या कुंटुबियांना प्रत्येकी 25 लाखाची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली. शहीद पोलिसांच्या रिटायरमेंटपर्यंत या कुंटुबियांना पगार मिळेल. तसंच शासनाच्यावतीनं घर उपलब्ध करुन देईल, असं मुख्यमंत्री पुढे म्हणाले. दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये 350 एनएसजी कंमाडोचा तर 400 पोलीस अधिकारी होते. राज्याकरिता स्वतंत्र एनएसजी कंमाडोचं पथक निर्माण करण्यासाठी केंद्राकडे मागणी करण्यात आलीय. हे अतिरेकी नेमके कोणत्या देशाचे आहेत, याबाबतचे पुरावे हाती आले असले तरी याबाबतचा अधिकृत खुलासा अजूनही झाला नसल्याचं विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, हिवाळी अधिवेशन पुढं ढकलण्यात आलं असून ते आता 11 डिसेंबरला सुरू होणार आहे. आतापर्यंत 121 मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात आले आहेत. या हल्ल्यात एकूण 22 विदेशी नागरिक जखमी झालेत. त्यातील 18 जण मृत्युमुखी पडलेत.

close