रिव्हूर व्ह्यू हॉटेलचे मालक जयंत पवार निर्दोष

August 29, 2012 4:11 PM0 commentsViews: 7

29 ऑगस्ट

पुण्यात झालेल्या अल्पवयीन मुलांच्या पार्टी प्रकरणात हॉटेलमालक जयंत पवार हे दोषी नाहीत अशी क्लीन चीट पुणे पोलिसांनी दिली. त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. याप्रकरणात केवळ आयोजकच दोषी आहेत असं स्पष्टीकरण पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर भानुप्रताप बर्गे यांनी केलं. 25 ऑगस्टला मुंढवा येथील जयंत पवार यांच्या रिव्हूर व्ह्यू या हॉटेलमध्ये तब्बल 800 शाळकरी मुला-मुलींची दारु पार्टी झाली होती. मुलांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर या पार्टीचा पर्दाफाश झाला. ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली होती त्या हॉटेलचे मालक जयंत पवार हे पुण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चुलत भाऊ आहे. त्यामुळे हा प्रकार समोर येताच वेगवेगळ्या चर्चांना ऊतू आला होता. मात्र जयंत पवार यांना वाचवले जात आहे असा आरोप आता होत आहे.

close