पुण्यात बाप्पांना निरोप देताना बँडपथकांवर बंदी ?

August 29, 2012 4:30 PM0 commentsViews: 23

29 ऑगस्ट

यंदा पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत कदाचित बँडपथकाचा आवाज हरपण्याची शक्यता आहे. बँडपथकांमध्ये संगीत वाद्यं ठेवणार्‍या गाडीवर पोलीस विभागाकडून बंदी घालण्यात येत आहे. बँडपथकांना गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे ऐन सिजनच्या वेळी पुण्यातील बँड चालक आणि मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुण्यातील फरासखाना आणि विश्राम बाग पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी पुण्यातील बॅड पथकातल्या दहाच्या वर गाड्या पोलीस स्टेशन मध्ये जमा केल्या आहेत. त्यामुळे बँड पथक कसं चालवायचं असा प्रश्न पुण्यातले बँड चालक आणि मालक संघाला पडला आहे.

close