कसाबला फाशी जुंदलचं काय ?

August 29, 2012 4:42 PM0 commentsViews: 2

29 ऑगस्ट

अजमल कसाबला शिक्षा झाली असली तरी मुंबईवर झालेल्या या सर्वात मोठ्या अतिरेकी हल्ल्यामागचा सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी अतिरेकी अबू जुंदल मुख्य सुत्रधार आहे. त्यांने याबद्दल कबुलीही दिली. पण आता पुढचा तपास सुरू झाला आहे. लष्कर-ए-तोयबाचा संशयित अतिरेकी आणि 26/11 मुंबई हल्ल्यातला संशयित सूत्रधार अबू जुंदल याचीही क्राईम ब्रांचने चौकशी केली आहे. त्यात काही ठोस पुरावे मिळाल्याचं क्राईम ब्रांचचे जॉईंट सीपी हिमांशु रॉय यांनी सांगितलंय. त्याच्याविरोधातलं आरोपपत्र वर्षअखेर सादर केलं जाणार आहे. जुंदलच्या तपासातून मुंबईवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचाच हात होता, हे स्पष्ट होईल असा विश्वास पोलिसांना वाटतोय. जुंदलने आपल्याला आणि आपल्या साथीदारांना हिंदी शिकवल्याची कबुली कसाबने दिलीय. तसेच 26/11च्या रात्री जुंदलच कराचीतल्या लष्कर-ए-तोएबाच्या हेडक्वार्टरमध्ये बसून अतिरेक्यांना सूचनाही देत होता.

close