‘आदर्श’ची जमीन लष्कराची’

August 30, 2012 5:48 PM0 commentsViews: 1

30 ऑगस्ट

वादग्रस्त आदर्श सोसायटीची जमीन राज्य सरकारची आहे असा निष्कर्ष जे. ए. पाटील न्यायालयीन आयोगाने काढला आहे. पण आदर्शची जमीन लष्कराच्या ताब्यात होती, असा दावा सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला आहे. ही जमीन कुकरी पार्क नावाने लष्कराच्या ताब्यात होती. तसेच तिला चारही बाजूनं कुंपण होतं.

पण, डिसेंबर 2003 मध्ये आदर्श खटल्यातले आरोपी टी. के. कौल, आर. के. बक्षी, आर. सी. ठाकूर आणि एम. एम. वांच्छू यांनी संगनमताने बनावट पत्र तयार केले. त्यात आदर्शची जमीन कधीच लष्कराच्या ताब्यात नव्हती, अशी खोटी नोंद केली. हेच पत्र पुढे पुण्याच्या सदर्न कमांडनी दिल्लीतल्या लष्कराच्या मुख्यालयाला पाठवलं. हा सर्व बनाव सीबीआयने तपासानंतर आरोपपत्रात कागदपत्रांसह उघड केला. त्यात आदर्शची जमीन ही आधीपासूनच लष्कराच्या ताब्यात होती, असा दावा केला. यापूर्वी आदर्श प्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या न्यायालयीन आयोगाने ही जागा राज्य सरकारची आहे, असा दावा केला होता. पण, नेमकं उलटा दावा सीबीआयनं केल्यामुळे नेमकी जमीन कुणाची हा तिढा कायम आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या 24 सप्टेंबरला हायकोर्टात होणार आहे.