भाजपचा गोंधळ कायम, सपाचा चर्चेसाठी पुढाकार

August 30, 2012 10:47 AM0 commentsViews: 4

30 ऑगस्ट

संसदेतल्या तिढा सलग सातव्या दिवशीही कायम आहे. कोळसा खाण घोटाळ्यावरुन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर ठाम असलेल्या भाजपच्या खासदारांनी आजही संसदेत गोंधळ घातला. संसदेतली कोंडी फोडण्यासाठी आता समाजवादी पक्ष आणि डाव्या पक्षांनी पुढाकार घेतला. आज सपा, डावे पक्ष आणि तेलगु देसम पार्टीच्या नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीत संसदेत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. तसेच कोळसा घोटाळ्याची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी करण्यासाठी उद्या संसदेबाहेर या पक्षांचे 50 खासदार आंदोलन करणार आहेत. संसद चालू नये यासाठी काँग्रेस आणि भाजप यांचं संगनमत झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आली. लोकसभेतील गोंधळा दरम्यानच सरकारने दोन विधेयकं मंजूर करुन घेतली. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं.

close