पाकचा यू टर्न, आयएसआय प्रमुखांना पाठवणार नाही

November 29, 2008 1:18 PM0 commentsViews: 3

29 नोव्हेंबर, इस्लामाबाद पाकिस्ताननं यूटर्न घेत आयएसआय प्रमुख शुजा पाशा यांना भारतात न पाठवण्याचा निर्णय घेतलाय. लष्कराच्या दबावाखाली पाक सरकारनं त्यांना न पाठवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्याजागी पाक गुप्तचर संस्थेच्या अधिकार्‍याला पाठवण्याचा निर्णय पाकिस्तानं घेतलाय. पंतप्रधान सैय्यद गिलानी यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या मंत्रिमंडळांच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी सहभागी होते. या बैठकीत मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या संबंधावर चर्चा करण्यात आली.

close