पनवेल शवविच्छेदन केंद्रात मृतदेह सडली

August 30, 2012 7:58 AM0 commentsViews: 4

30 ऑगस्ट

पनवेल ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात नवे शवविच्छेदन केंद्र सुरु झाले असूनसुद्धा जुन्या आणि पडक्या खोल्यांमध्ये मृतदेह सडत आहेत. पनवेल ग्रामीण रुग्णालयाच्या 10 वर्षा पुर्वी बांधलेल्या या शव विच्छेदन केंद्राची ही दयनीय अवस्था आहे. बकाल अवस्थेत असलेल्या दोन पडक्या खोल्यांमध्ये पाण्यामध्ये मृतदेह टाकण्यात आले आहेत. रसायनांचा वापर करुन मृतदेह ठेवण्याएवजी या खोल्यामध्ये उघड्यावरच हे मृृतदेह ठेवण्यात आले आहे. हे मृतदेह आता कुजत आहेत तर कीडेही येथे निर्माण झाले आहेत. मुंबई – पुणे हायवेच्या जवळच असणार्‍या पनवेल ग्रामीण रुग्णालयात अनेक बेवारस मृतदेह येत असतात. पण ग्रामीण रुग्णालयाची नवी इमारत तयार असूनही फक्त नव्या शवविच्छेदन गृहापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने जुन्याच खोल्यामध्ये मृतदेह ठेवत असल्याच ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. भावना तेलंग यांनी सांगितलं आहे.

close