तुटक्या फुटक्या घरात थाटलाय पोलिसांनी संसार !

August 30, 2012 11:07 AM0 commentsViews: 14

30 ऑगस्ट

एकीकडे जनतेची जीवाची सुरक्षा करताना मात्र पालीस कर्मचारीच सरकारच्या उदासिनतेमुळे असुरक्षित जीवन जगत आहेत. मनमाड शहरातील पोलीस वसाहतीची दुर्दशा झाली आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. इमारती कमकुवत झाल्यामुळे पोलिसांचे कुटुंबीय जीव मुठीत धरून राहतात. तुटलेल्या खिडक्या, पावसात गळणार्‍या खोल्या, चहुबाजूंनी पसरलेलं घाणीचं साम्राज्य, बोरिंग असूनही पिण्याची पाण्याची वानवाच आणि लहान-लहान घरांमध्ये कोंडमारा होत असलेली कुटुंबं अशी या लोकांची व्यथा आहे.

मनमाड पोलीस स्थानकाअंतर्गत मनमाड शहरासह 19 गावं येतात. सुमारे दीड लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी इथल्या पोलिसांवर आहे. यासाठी एक पोलीस अधिक्षक, एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक निरीक्षक, पाच उपनिरीक्षक आणि 114 कर्मचारी आहेत. या सगळ्यांसाठी केवळ 95 घरं बांधण्यात आली आहेत. पोलीस ही चाळ आणि इमारत जुनी झाल्यामुळे तिची अवस्था दयनीय झालीय. आधीच लहान लहान जागेत संसार थाटून बसलेल्या कुटुंबीयांना सुविधांचीसुद्धा तितकीच वानवा आहे. ही इमारत कमकुवत झाल्याने ती राहण्यायोग्य नसल्याचा शेरा खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागानेच मारलाय. मात्र तरीही सरकार पोलिसांच्या या अवस्थेकडे लक्ष देण्यास तयार नाही.

close