विलासरावांचे निधन हलगर्जीपणामुळे ?

August 31, 2012 12:26 PM0 commentsViews: 17

31 ऑगस्ट

हसमुख, रुबाबदार, उमदा नेता अशी ज्यांची ओळख होती त्या विलासराव देशमुख यांच्या निधनाची बातमी विश्वास न ठेवणारी होती. विलासरावांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे लातूर तर पोरकं झालंच पण महाराष्ट्राच्या राजकारणातही पोकळी निर्माण झाली. पण या 'राजहंसा'ची चटका लावून जाणारी एक्झीट ही आजाराबाबतची गुप्तता आणि हलगर्जीपणामुळे झाल्याची धक्कादायक माहिती कलमनामा या साप्ताहिकाने प्रसिध्द केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्र आणि विलासरावांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांचं यकृताच्या कॅन्सरनं काही दिवसांपूर्वी निधन झालं. विलासरावांना हेपिटायटीस बीची लागण झाली होती, त्याचा परिणाम त्यांच्या यकृतावर झाला, पण यकृत बदलण्याच्या पलिकडे परिस्थिती गेल्याचं अमेरिकेतील डॉक्टर्सनी अमित देशमुख यांना सांगितलं. पण त्यानंतर अमित देशमुख यांनी मुंबईतील काही डॉक्टर्सची यकृत प्रत्यारोपणाबद्दल भेट घेतली. पण त्यांनी पेशंटचं नाव लपवलं. त्यामुळे पुढे त्यांना राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या समितीने यकृत नाकारलं असा दावाही या लेखात करण्यात आलाय. नियमांनुसार आता यकृत प्रत्यारोपण शक्य नाही, असं ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं असतानाही नाजूक परिस्थितीत विलासरावांना चेन्नईला हलवण्याचा सल्ला त्यांच्या कुटुंबीयांना डॉ रेला यांनी कसा दिला असा सवालही या लेखात उपस्थित करण्यात आला.

close