बल्क एसएमएसवरील बंदी उठवली

August 30, 2012 12:31 PM0 commentsViews: 5

30 ऑगस्ट

मोबाईल धारकांसाठी गुड न्यूज…गेल्या पंधरा दिवसांपासून घालण्यात आलेल्या बल्क एसएमएसवर सरकारने बंदी उठवली आहे. आसाम आणि म्यानमार येथील घडलेल्या दंगलीचे पडसाद देशभरात उमटले होते. एसएमएस,एमएमएसच्या माध्यमातून आसामी लोकांविरोधात धमक्या, अफवा पसरवल्या जात होत्या. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी सरकारने बल्क एसएमएसवर 17 ऑगस्टला 15 दिवसांची बंदी घातली होती. यामुळे 5 एसएमएसपेक्षा जास्त एसएमएस पाठवले जात नव्हते. याच बरोबर एमएमएसवरही बंदी घालण्यात आली होती. आताही बंदी उठवण्यात आली आहे. काही महिन्यापुर्वीच केंद्र सरकारने 100 एसएमएसची मर्यादा वाढवून ती 200 एसएमएसवर करण्यात आली होती.

close