दुसर्‍या टेस्टमध्ये न्यूझीलंड 6 बाद 328 धावा

August 31, 2012 2:26 PM0 commentsViews: 3

31 ऑगस्ट

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आजपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर दुसर्‍या टेस्ट मॅचला सुरुवात झाली. पहिला दिवस न्यूझीलंडच्या बॅट्समननं गाजवला. पहिल्या दिवस अखेर न्यूझीलंडने 6 विकेट गमावत 328 रन्स केले आहे. हैदराबाद मॅचमधल्या पराभवातून धडा घेत न्यूझीलंडच्या प्रमुख बॅट्समनने जबाबादारीने बॅटिंग करत टीमला पहिल्या इनिंगमध्ये मोठा स्कोर उभा करुन दिला. न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, पण ओपनिंगला आलेला ब्रँडन मॅक्युलम शुन्यावर आऊट झाला. झहीर खानने मॅक्युलमची विकेट घेत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. तर तिसर्‍या क्रमांकावर बॅटिंगला आलेला विल्यमसनही झटपट आऊट झाला. पण यानंतर मार्टिन गुप्टील आणि कॅप्टन रॉस टेलरनं न्यूझीलंडची इनिंग सावरली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 107 रन्सची पार्टनरशिप केली. गुप्टील 57 रन्स करुन आऊट झाला. पण कॅप्टन रॉस टेलरनं शानदार सेंच्युरी ठोकली. ही जोडी आऊट झाल्यानंतर वॅन विक आणि ब्रासवेलनं मॅचची सूत्र आपल्या हाती घेतली. या दोघांनी पहिल्या दिवस खेळून काढला. पहिल्या दिवस अखेर वॅन विक 63 तर ब्रासवेल 30 रन्सवर नॉटआऊट आहेत.

close