‘चिल्लर’ पार्टीच्या आयोजकांवर कारवाई करायला हलगर्जीपणा -गोर्‍हे

August 31, 2012 2:48 PM0 commentsViews: 9

31 ऑगस्ट

पुण्यातील शाळकरी मुलांच्या चिल्लर पार्टी प्रकरणी पोलीस किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या दोन्हींकडून कारवाई करायला हलगर्जीपणा केला जातोय असा आरोप शिवसेना आमदार निलम गोर्‍हे यांनी केला आहे. चिल्लर पार्टी प्रकरणामध्ये आयोजकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक परवानगी घेतली नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. अशा पद्धतीची पार्टी आयोजित केली जाणार असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेत करमणूक कर भरणं आवश्यक असतं. मात्र त्यांनी अशी परवानगी घेतली नव्हतीच शिवाय करमणूक करही भरला नाही. तरीही आयोजकांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक कर विभागाने कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे आज नीलम गोर्‍हेंनी निवासी जिल्हाधिकारी अनिल पवार यांची यासंदर्भात भेट घेऊन ठोस कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आमदार महादेव बाबर हे देखिल उपस्थित होते. आयोजकांच्या बरोबरीने लिज होल्डर आणि मालकांवरही कारवाई केली जावी अशी मागणी नीलम गोर्‍हेंनी केली आहे.

close