शेतकर्‍यांनी बांधली पतंगराव कदमांच्या दारात जनावरे

August 30, 2012 1:35 PM0 commentsViews: 3

30 ऑगस्ट

सांगली जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून सुध्दा तालुक्यात चारा छावण्या सुरु करण्यात आल्या नसल्यामुळे संतप्त शेतकरी आणि मेंढपाळांनी आपली जणावरं मदत-पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्या दारातच बांधली. आज गुरुवारी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि मेंढपाळांनी आपल्या जनावरांसह मदत-पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्या सांगलीतल्या घरावर मोर्चा काढला.

जनावरांना चारा-पाणी मिळावा या मागणीसाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात शंखनाद करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि गृहमंत्री यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आंदोलकांनी पालकमंत्री पतंगराव कदम यांच्या दारातच जनावरं बांधली. सांगली जिल्ह्यात आठ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला. पण, अजून कुठल्याच तालुक्यात चारा छावणी सुरू झालेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. या आंदोलनातल्या 18 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

close