खूनाच्या खटल्यात माजी न्यायधीशाला जन्मठेप

August 30, 2012 1:46 PM0 commentsViews: 5

30 ऑगस्ट

न्यायदानाचे काम करणार्‍या एका माजी न्यायाधीशालाच श्रीरामपूर कोर्टाने खूनप्रकरणी आज जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. 2004 साली पैशाच्या वादातून महिलेचा खून करणारा निलंबित न्यायाधीश सलीम पठाण याने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला मात्र आज त्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास आणखी वाढणार आहे. 2000 साली जमीला शेख या महिलेला 3 लाख रूपयांना आपल्याकडील फ्लॅट विकणार्‍या निलंबित न्यायाधीश सलीम पठाण यांनी पैसे आणि फ्लॅट परत न देण्याच्या उद्देशाने 2004 साली जमीलाचा खून केला. मात्र हा खून नसून आत्महत्या असल्याचा आधी भासवण्यात आलं. शेवटी पोलीस तपासात तो खून असल्याचंच सिद्ध झालं. आणि हा खून निलंबित न्यायाधिशांनीच केल्याचं स्पष्ट झालं. तीन-चार वर्ष हे न्यायाधीश महाशय फरार होते. आज श्रीरामपूरच्या कुलकर्णी यांच्या कोर्टासमोर या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून माजी न्यायाधीश सलीम तांबोळी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय तर त्यांच्या पत्नीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

close