संसद ठप्प करण्यापेक्षा निवडणुकीत दोन हात करावेत – पंतप्रधान

August 31, 2012 5:16 PM0 commentsViews: 4

31 ऑगस्ट

कोळसा खाणवाटपाबाबतच्या कॅगच्या रिपोर्टवरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजपला फटकारलंय. याप्रकरणी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाहीअशा स्पष्ट पंतप्रधानांनी भाजपला सुनावले. अलिप्ततावादी देशांच्या शिखर परिषदेनंतर तेहरानहून परतताना पंतप्रधान पत्रकारांशी बोलत होते. कोळसा खाणवाटप प्रकरणावरून विरोधकांशी राजकीय चिखलफेक करण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचं ते म्हणाले. भाजपने संसदेचं कामकाज बंद पाडण्याऐवजी पुढच्या निवडणुकीत आमच्याशी दोन हात करावेत, असं आव्हानही पंतप्रधानांनी दिलंय. राहुल गांधींनी मंत्रिपद स्वीकारावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.

पंतप्रधान म्हणतात,

जर मला राजीनामा द्यायचा असता, तर मी आता इथे नसतो. मी अपेक्षा करतो की विरोधकांना समजेल की आपण संसदीय लोकशाहीचे पालन करतो. लोकांनी आम्हाला 5 वर्षांसाठी निवडून दिलंय. मी अपेक्षा करतो की भाजप लोकांच्या मताचा आदर करेल आणि सरकारला काम करू देईल. संसदीय लोकशाहीत बहुमत असणार्‍यांना राज्य करण्याचा अधिकार असतो हे भाजपला मान्य नसल्यामुळे हा गदोरळ होतोय. अजूनही फार उशीर झाला नाही. आपण एकत्र येऊन संसदीय लोकशाहीच्या मार्गाने देशातल्या समस्या सोडवूया – पंतप्रधान

close