राज ठाकरे यांना कोर्टाची समन्स

August 30, 2012 2:11 PM0 commentsViews:

30 ऑगस्ट

2008 साली कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून परप्रांतीय तरुणांना बेदम मारहाण झाल्याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना समन्स बजावले आहे. आणि 28 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात बिहार येथील कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी आता दिल्लीत होणार आहे. राज ठाकरे यांनी मनसे पक्षाची स्थापना केल्यानंतर थेट परप्रांतीयांच्या विरोधात मोहिम उघडली होती. मराठी माणसाला त्याची हक्काची जागा मिळालीच पाहिजे असा नारा देत परप्रांतीय लोकांना भेटले तिथे मनसे स्टाईलने हिसका दाखवण्यास सुरुवात झाली होती. याच काळात रेल्वे भरतीची परीक्षा होणार होती. परप्रांतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने बिहार,युपीमधून मुंबईला रवाना झाले होते. मात्र संतप्त मनसे सैनिकांनी कल्याण स्थानकावर या विद्यार्थ्यांना गाठून चांगलेच झोडपून काढत पिटाळून लावले होते.

close