रेल्वे कर्मचार्‍याच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले

November 29, 2008 4:14 PM0 commentsViews: 4

29 नोव्हेंबर, मुंबई सीएसटी स्टेशनवर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात अनेकांचे प्राण गेले. यापेक्षाही अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले असते, जर रेल्वे टाईम टेबलची घोषणा करणार्‍या त्या माणसाने लोकांना बाहेर पडायचा इशारा दिला नसता.सीएसटी स्थानकात व्ही.डि झेंडे यांची संध्याकाळची शिफ्ट सुरू होती आणि दक्षिण मुंबईतील सीएसटी स्टेशनवरील छोट्याश्या खोलीतून नेहमीप्रमाणे ते रेल्वेचं येण्याजाण्याचं वेळापत्रक लोकांपर्यंत पोहचवत होते. पण तेवढ्यातच 2 दहशतवादी प्लेटफॉर्मवर आले आणि त्यांनी प्रवाशांवर गोळीबार करायला सुरुवात केली. ' मी एक मोठा धमाका ऐकला आणि लोकांना सैरावैरा पळताना पाहिलं. म्हणून मी जीआरपी तसंच आरपीएफसाठी घोषणा सुरू केली. झेंडेनी केलेल्या घोषणेनंतर पोलीस काही आले नाहीत. फक्त घाबरलेल्या प्रवाशी सगळीकडे दिसत होते. ' जेव्हा लोकं रक्तानं माखलेली मला दिसली. मला लक्षात आलं की कुठेतरी गोळीबार सुरू आहे. म्हणून मी प्रवाशांना स्टेशनच्या बाहेर जाण्याची घोषणा करायला लागलो ', असं झेंडे सांगत होते. जेव्हा प्लॅटफॉर्म सगळा पूर्णपणे रिकामा झाला. तेव्हा गोळ्या त्यांच्या दिशेने धडकायला लागल्या. ' ते आमच्यासमोर इथे जवळजवळ अर्धातास उभे होते. त्यांच्याजवळ मोठ्या बंदुका तसंच ग्रेनेड होते' ,असं झेंडेंचे सहकारी शेखर सांगत होते. त्या दहशतवाद्यांच्या सावटाखाली जर या माणसांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर 26 नोव्हेंबरच्या रात्री आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले असते.

close