नरेंद्र मोदींचे वेब चॅट वादाच्या भोवर्‍यात

September 1, 2012 10:48 AM0 commentsViews: 1

01 सप्टेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोंदी केलेला वेब चॅट सध्या वादात सापडला. काल नरेंद्र मोदींनी इंटरनेटवर एक वेब चॅट केला ज्याचं सूत्रसंचालन फिल्मस्टार अजय देवगण याने केलं होतं. मोदींनी नेटीझन्सच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. आणि गुजरातच्या प्रगतीविषयी माहिती दिली. पण माजी आयपीएस ऑफिसर संजीव भट्ट यांनी या वेब चॅटवर आक्षेप घेतला आहे. ज्या दिवशी भाजपच्या आमदारांना नरोडा पाटिया प्रकरणात शिक्षा सुनावली जाते त्याच दिवशी मोदी अशा पद्धतीने सरकारचे गुणगान करणारा वेबचॅट करतात यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. मोदींच्या या वेबचॅटच्या वेळेवरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

close