सचिन,धोणी, विराटला आयसीसी पुरस्कारासाठी नॉमिनेशन

August 30, 2012 3:23 PM0 commentsViews: 13

30 ऑगस्ट

2012 या वर्षातल्या आयसीसी क्रिकेट ऍवॉर्डच्या नॉमिनेशनची आज घोषणा करण्यात आली. यात केवळ तीन भारतीय क्रिकेटपटूंना स्थान मिळवण्यात यश आलं आहे. वन डे क्रिकेटर ऑफ द इयरसाठी महेंद्रसिंग धोणी आणि विराट कोहलीला नॉमिनेशन मिळालंय. तर पिपल्स चॉईस विभागात सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटसाठीच्या नॉमिनेशनमध्ये एकाही भारतीय क्रिकेटपटूचा समावेश नाही. क्रिकेटर ऑफ द इयरसाठी दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला, वर्नान फिलँडर, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकेल क्लार्क आणि श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. टेस्ट क्रिकेटर ऑफ इयरसाठीही याच खेळाडूंमध्ये चुरस असणार आहे.

close