कोळसा घोटाळ्याची न्यायालयीन चौकशीचा प्रस्ताव ?

September 1, 2012 11:12 AM0 commentsViews: 3

01 सप्टेंबर

कोळसा खाण घोटाळ्यावरुन गेल्या आठ दिवसांपासून संसदेचं कामकाज ठप्प आहे. संसदेतील कोंडी फोडण्याचा प्रयत्न आता सरकारने सुरू केला आहे. काँग्रेसच्या कोअर कमिटीची काल संध्याकाळी बैठक झाली. त्यात कामकाज सुरळीत सुरू करण्यासाठी भाजपला एक ऑफर देण्याचा प्रस्ताव हायकमांडनी मांडला. सीबीआय तपासासोबतच कोळसा घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याचा हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही कोळसा खाणींचं पुन्हा मूल्यांकन करायलाही काँग्रेस तयार असल्याचं समजतंय. या आठवड्याच्या शेवटी हा प्रस्ताव भाजपला दिला जाण्याची शक्यता आहे.

close