ओबेरॉयमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात उद्योजकांचा मृत्यू

November 29, 2008 4:28 PM0 commentsViews: 3

29 नोव्हेंबर, मुंबई ओबेरॉय हॉटेलच्या टिफिन कॉफी शॉपमध्ये हल्ल्याच्या वेळी आलेले सर्वच जण अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात बळी पडलेत. दुर्देवानं यात उद्योगक्षेत्राशी संबंधित अनेकांचा समावेश आहे. येस बँकेचे नॉन-एक्झिक्युटीव्ह चेअरमन अशोक कपूर हे या हल्ल्यात मरण पावलेत. ते त्यांच्या पत्नीसह तिथं गेले होते. त्याचबरोबर शिपिंग व्यावसायिक सुनील पारेख आणि त्यांची पत्नीही दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. प्रॉपर्टी इन्वेस्टर आणि ताओ आर्ट गॅलरीच्या मालक कल्पना शाह यांचे पती पंकज शाह हे देखील यावेळी मारले गेले. तसंच इस्पात इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक विनोद गर्ग यांच्या पत्नी उमा गर्ग याही या हल्ल्यात मरण पावल्या.ओबेरॉय हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मार्शल आर्ट्स आणि कराटेपटू फारुख दिनशॉ ठार झालेत. ते पन्नास वर्षांचे होते. रिटायरमेंट नंतर मार्शल आर्ट्स आणि कराटेच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी वाहून घेतलं होतं. 26 नोव्हेंबरच्या रात्री दहशतवादी ओबेरॉय हॉटेलमध्ये घुसले तेव्हा दिनशॉ त्यांच्या एका शिष्याबरोबर तिथल्याच एका रेस्तरॉमध्ये जेवायला गेले होते. दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात ते जखमी झाले. त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण अति रक्तस्त्रावामुळे 27 तारखेला हॉस्पिटलमध्येच त्यांनी प्राण सोडला. कराटे, मार्शल आर्ट्स आणि फिटनेसवर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली होती.

close