लाच प्रकरणी शिवाजीराव मोघेंवर खटला चालवा -कोर्ट

September 1, 2012 12:04 PM0 commentsViews: 5

01 सप्टेंबर

42 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यावर खटला चालविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यवतमाळच्या सत्र न्यायालयाने हे आदेश दिले आहे. कुर्ली गावचे सरपंच अयानुद्दीन सोलंकी यांना शाळेच्या परवानगीसाठी मोघे यांच्या पीएकडे 42 लाख रुपये दिले होते. पण पैसै दिल्यानंतरही परवानगी मिळाली नाही, याबाबत सोळंकी यांनी पोलिसात तक्रार केली होती. अखेर या प्रकरणी कोर्टाने खटला दाखल चालविण्याचे आदेश दिले आहे.

close