भारताचा ‘विराट’ विजय; न्यूझीलंडला व्हाईटवॉश

September 3, 2012 12:13 PM0 commentsViews: 2

03 सप्टेंबरटीम इंडियाने बंगळुरु टेस्टमध्ये शानदार विजय मिळवत न्यूझीलंडचा 5 विकेटने पराभव केला असून भारताने 2 टेस्टच्या या सीरिजमध्ये न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला आहे. न्यूझीलंडनं विजयासाठी भारतासमोर 261 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. आज न्यूझीलंडची शेपटी झटपट गुंडाळत भारतीय टीमने सुरुवात तर चांगली केली पण भारताची सुरुवातही खराब झाली. भारताचे पहिले पाच बॅट्समन झटपट आऊट झाले आणि त्यामुळे विजयासाठी सोपं वाटणारं आव्हान जास्त कठीण बनलं. सेहवाग, गंभीर ही ओपनिंग जोडी 83 रन्सवर आऊट झाली. तर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झाला. 27 रन्सवर त्याला टीम साऊथीने क्लीन बोल्ड केलं. चेतेश्वर पूजाराने 48 रन्स केले. तर सुरेश रैनाला भोपळाही फोडता आला नाही. पण त्यानंतर विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोणीने मोर्चा सांभाळत भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने त्याच्या करिअरमधील पाचवी हाफ सेंच्युरी ठोकली. तर कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने पुन्हा एकदा कॅप्टन्स इनिंग पेश केली. धोणीने 2 शानदार सिक्स मारत नॉट आऊट 48 रन्स केले.

close