गोंदियात एका काळवीटाची शिकार

September 1, 2012 12:17 PM0 commentsViews: 3

01 सप्टेंबर

काळविटांच्या वाढत्या शिकारीला आळा घालण्यात गोंदिया वनविभागाला अपयश येतंय. आमगाव तालुक्यातील नंसरी मुंडीपार इथं अजून एका काळवीटाच्या शिकारीची घटना उजेडात आली आहे. जिल्हात गेल्या 3 महिन्यात 10 काळवीटांची शिकार करण्यात आली आहे. काळवीट शेड्यूल वनमध्ये मोडतात, आणि काही मोजक्याच ठिकाणी हा प्राणी आढळतो. पाण्याच्या शोधार्थ तळ्याकडे येणार्‍या काळवीटाची शिकार करण्याचा पॅटर्नचं शिकार्‍यांनी राबविला आहे. वनविभागाच्या या नाकर्तेपणावर वन्यप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे.

close