नांदेडमधून 4 संशयित दहशतवाद्यांना अटक

September 1, 2012 1:38 PM0 commentsViews: 2

01 सप्टेंबर

नांदेडमध्ये 4 संशयित दहशतवाद्यांना एटीएसने काल शुक्रवारी अटक केली आहे. या चौघांना 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. आणखी 3 संशयित दहशतवादी फरार असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. एटीएसने दुसर्‍या दिवशीही कसून तपास सुरु ठेवला आहे. नांदेडमधल्या देगलूर नाका भागात एटीएसने आज कसून चौकशी केली. या सर्व संशयितांना मुंबईत आणलं गेलं आहे. 26/11 हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अबू जुंदलची सध्या चौकशी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या अटकेला महत्त्व आहे.

दरम्यान, बंगळुरू पोलिसांनी आणखी एका संशयिताला हैदराबादमधून ताब्यात घेतलंय. त्याचं नाव ओबेद रहमान आहे. गुरुवारी बंगळुरूमध्ये 11 संशयितांना अटक करण्यात आली होती. या अटकेमुळे मोठा दहशतवादी कट उधळून लावल्याचा दावा पोलिसांनी केलाय. बंगळुरू, नांदेड आणि हैदराबाद या तिन्ही ठिकाणी अटक करण्यात आलेल्या दहशवाद्यांमध्ये संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या दहशतवाद्यांना सौदी अरेबियातून हाताळण्यात येत होतं. हैदराबादमधले 2 नगरसेवक आणि एका हिंदू नेत्याची हत्या करण्याचा त्यांचा कट होता, असं पोलिसांनी सांगितलंय. अणुप्रकल्पासारख्या संवेदनशील ठिकाणंही त्यांच्या टार्गेटवर होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

close