वाघोली पार्टीतील तरुणांचा पोलिसांवरच आरोप

September 3, 2012 1:53 PM0 commentsViews: 16

03 सप्टेंबर

पुण्यात विनापरवाना पार्टी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुण तरुणांनी पोलिसांवर आरोप केले आहे. पोलिसांनी केलेली कारवाई अयोग्य असून पोलिसांनी आम्हाला विनाकारण त्रास दिला असा आरोप या तरुणांनी केला आहे. वाघोली इथल्या हॉटेल माया क्लबमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू करणार्‍या 300 तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या कारवाई 9 लाख 80 हजार रुपयांची दारु जप्त करण्यात आली होती. या हॉटेलमध्ये दारु पिण्याला परवानगी नसताना इथं रात्री दोन वाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती. असं पोलिसांनी सांगितलं होतं. हॉटेल माया क्लब पुण्यातल्याच एका पोलीस इन्स्पेक्टरच्या पत्नीच्या मालकीचं आहे.

close