राज ठाकरेंना शिवसेनेचा पाठिंबा

September 3, 2012 9:13 AM0 commentsViews: 2

03 सप्टेंबर

शिवसेनेनंही आता उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरेंच्या सूरात सूर मिसळला आहे. 11 ऑगस्टच्या हिंसाचारात अमर जवान या शहीद स्मारकाची तोडफोड करणार्‍या कादीर या आरोपीला महाराष्ट्र पोलिसांनी बिहारमध्ये जावून अटक केली. त्यामुळे एवढं काहुर माजवण्याचं काय काम आहे असा सवाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेचं मुखपत्र सामनामधून बिहार सरकारला केला आहे. बिहारच्या मुख्य सचिवांना या विषयात तोंड घालण्याचं काहीही काम नव्हतं अशी टीकाही बाळासाहेबांनी केली. केवळ मतांवर डोळा ठेवून राजकारण केलं जातंय. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याचा सर्वांनीच निषेध करावा असंही ते म्हणाले. ठाकरे घराण्याचं कुळं हे बिहारमधलं नसून अस्सल शिवरायांच्या महाराष्ट्रातलं आहे असंही बाळासाहेबांनी दिग्विजय सिंग यांना ठणकावलं आहे.

close