ताज आणि ट्रायडंट करणार ‘ टेरर क्लेम ‘

November 29, 2008 4:34 PM0 commentsViews: 6

29 नोव्हेंबर, मुंबई ताज पॅलेस आणि ट्रायडंट हॉटेल्सचं या दहशतवादी हल्ल्यात बरंच नुकसान झालंय. या दोन्ही हॉटेल्सकडून आता कोट्यवधींचं संरक्षण विम्याचे दावे उभे राहतील , अशी माहिती सूत्रं देतायत. दहशतवादी हल्ल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे देशात अशा प्रकारचे विमा दावे पहिल्यादांच केले जातील, अशी शक्यता आहे. याला ' टेरर क्लेम ' असं म्हटलं जातं. इंडियन हॉटेल्स लिमिटेडची मालकी असणार्‍या ताजच्या विम्याची जबाबदारी टाटा एआयजी आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सकडे आहे तर ईस्ट इंडिया हॉटेल्सच्या मालकीच्या आताच्या ट्रायडंट म्हणजे ओबेरॉय हॉटेलचा विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे असल्याचं सूत्रांकडून समजलंय.

close