कृपांना सुप्रीम कोर्टाचा दणका ;एसआयटीच करणार चौकशी

September 3, 2012 9:55 AM0 commentsViews: 6

03 सप्टेंबर

मुंबई काँग्रेस माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी एसआयटीच करणार असं कोर्टाने म्हटलं आहे. एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येऊ नये अशी मागणी करणारी याचिका कृपाशंकर सिंग यांनी दाखल केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी कोर्टाने एसआयटीला 8 आठवड्यांची मुदत दिली आहे. हा तपास मुंबई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली करण्यात यावा असे आदेशही कोर्टाने दिलेत.

close