कल्याणमध्ये धो-धो पाऊस ; जनजीवन ठप्प

September 4, 2012 10:58 AM0 commentsViews: 5

04 सप्टेंबर

गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण परिसरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अंबरनाथमधल्या कमलाकर नगर आणि जावसाई परिसरातील सुमारे 50 ते 60 घरामध्ये पाणी शिरलं आहे. गेल्या 24 तासांपासून जवळपास गुडघाभर पाण्यात नागरीक राहत आहे. मात्र अंबरनाथ पालिकेनं या नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारची सोय केलेली नाही. सकाळपासून पडणार्‍या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. कल्याण बदलापूर रस्ता गेले पाच तास बंद आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणार्‍या अनेक गाड्यांचा खोळंबा झाला आहे. रस्त्यावर चार ते पाच फुट पाणी असल्यानं जड वाहनांच्या जवळपास एक किमी पर्यंत रांगा लागल्या आहे.

close