पोलिसी कारवाईविरोधात केजरीवाल यांचे आंदोलन

September 3, 2012 8:14 AM0 commentsViews: 3

03 सप्टेंबर

अण्णा हजारे यांचे सहकारी अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, मनिष शिसोदिया यांनी आज दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन केलं. यावेळी केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांनी अटक करुन घेतली. 26 ऑगस्टच्या निदर्शनानंतर पोलिसांनी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांवर खोट्या केसेस नोंदवल्यात असा आरोप केजरीवाल यांनी केला. आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस दररोज त्रास देत आहेत असा आरोपही त्यांनी केला. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात आज केजरीवाल यांनी संसद परिसरात असलेल्या पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं.

close