मेट्रो रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

September 5, 2012 9:23 AM0 commentsViews: 7

05 सप्टेंबर

मुंबई मेट्रो अपघात प्रकरणी साईट इंजिनिअर आणि सुपरवायजरविरोधात सहार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोघांच्या अटकेबाबत तपासाअंती निर्णय घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल मंगळवारी अंधेरी कुर्ला रोडवर हॉटेल लीलासमोर मेट्रो रेल्वेच्या पुलाचं बांधकाम सुरू असताना काही भाग कोसळला. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला. तर 19 जण जखमी झाले. मृताच्या नातेवाईकाला एक लाखाची मदत दिली जाणार आहे.

close