मनमाडमध्ये लोडशेडिंगविरोधात कडकडीत बंद

September 4, 2012 11:48 AM0 commentsViews: 3

04 सप्टेंबर

वीज कंपनीनं तब्बल सव्वा 6 तास लोडशेडिंग लागू केल्याच्या विरोधात आज मनमाडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. आतापर्यंत 5 तास असलेलं हे भारनियमन वीज कंपनीने वाढवल्यामुळे नागरिकांनी हा संप पुकारला आहे. सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 7 ते 11 यावेळात मनमाड अंधारात असतं. रेल्वे जंक्शन आणि व्यापारी शहर असलेल्या मनमाडचे संध्याकाळच्या लोडशेडिंगमुळे नुकसान होतं असल्याच्या तक्रारी आहेत. वीज चोरी आणि आर्थिक हानी ही दोन कारणं त्यामागे देण्यात आली आहे. पण, ही दोन्ही कारण मनमाडकरांना मान्य नाही.

धुळ्यात शिवसेनेचा झटका मोर्चा

तर दुसरीकडे धुळ्यातही शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या विरोधात झटका मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मोर्चात 2 हजार लोक सहभागी झाले होते. यात धुळ्यातले नागरिक, परिसरातले शेतकरी यांच्यासोबत पॉवरलुमचे कारागीरही सहभागी होते.

close