नवव्या दिवशीही संसदेत गदारोळ

September 3, 2012 8:17 AM0 commentsViews: 6

03 सप्टेंबर

पावसाळी अधिवेशनाचा या आठवड्यातला पहिला दिवशीही कोळसा खाणवाटपाच्या मुद्द्यावरून वाया गेला. दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. भाजपने चर्चा होऊ दिल्याशिवाय न्यायालयीन चौकशी किंवा खाणवाटप रद्दबाबत निर्णयाचे आश्वासन नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे. संपूर्ण अधिवेशनच वाया जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने गदारोळातच विधेयक मंजूर करून घेण्याचा सपाटा लावला आहे. गदारोळातच सरकारने लैंगिक अत्याचारविरोधी विधेयक मंजूर करून घेतलं.

close