दहशतीच्या सावटाखाली मॉल, थिएटर रिकामी

November 29, 2008 4:38 PM0 commentsViews: 15

29 नोव्हेंबर, मुंबई कविता थपलियालदहशतवादी हल्ल्यामुळे मुंबईकर काही काळ घरात कैद झाले होते. कामावर जाणार्‍या लोकांची संख्याही याकाळात रोडावली होती तर नेहमी गजबजलेले मॉल्सआणि सिनेमाघरातही शांतता होती.मुंबईतील ओबरॉय मॉलप्रमाणेच इथले अनेक मॉल्स रिकामे पडलेत. इतर वेळी गजबजलेले हे मॉल्स आज रिकामे आहेत. दहशतवाद्यांच्या भीतीचं सावट मॉल्सवरही दिसून येतंय. काही लोक खरेदी करण्यासाठी आलेत मात्र ते नुसतीच टेहळणी करुन परत जातायत पण लवकरच सगळ ठीक होईल, असं मॉल मालकांचं म्हणणं आहे. ' डिसेंबरमध्ये रिटेलर्स खूप ऑफर्स घेऊन येत आहेत. त्यामुळे हे चित्र लवकरच बदलेल ', असं ओबरॉय मॉल बिझनेस हेड शीबू फिलीप्स सांगत होते. मॉल्सची ही स्थिती तर सिनेमागृहांमध्येही काही वेगळं चित्र नाही. 'ओए लक्की ओए ' आणि ' सॉरी भाई ' असं दोन्हीही छोट्या बजेटचे आणि मोठे स्टार नसलेले सिनेमा रिलिज झालेत पण मुंबईतील तणावानं लोकांना थिएटर्सपासून दूर ठेवलंय. त्यामुळे बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनमध्ये 50 टक्के घट झाली आहे. ' गुरुवारी सिनेमॅक्सला 15 लाखांचा तोटा झाला. तर शुक्रवारी आणि शनिवारी नेहमीपेक्षा प्रेक्षकांची संख्या कमी होती.अंदाजे 50 टक्के नुकसान झालंय ' असं सिनेमॅक्स मुख्य व्ही.पी देवांग संपत यांनी सांगितलं.डिसेंबर-जानेवारीचा सिझन हा लग्न आणि पाटर्‌यांचा असतो. त्यामुळे रिटेलर्संना थोडी आशा अजून आहे. काही दिवसात मॉल पुन्हा भरुन जातील आणि डिसेंबरमध्ये शाहरुख खानचा ' रब ने बना दी ' जोडी आणि आमिरचा ' गजनी ' सिनेमा लोकांना आकर्षित करेल, असं त्यांना वाटतंय.

close