राणेंचे विरोधक पारकर काँग्रेसच्या वाटेवर ?

September 5, 2012 9:34 AM0 commentsViews: 5

05 सप्टेंबर

तळकोकणात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात काँग्रेसचे नेते नारायण राणेंचे अत्यंत कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे नेते संदेश पारकर आता राष्ट्रवादी सोडून राणेंनाच जाऊन मिळणार असल्याची चिन्हं दिसत आहे. पारकर यांना राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारणीतून डावललं गेलंय. पक्ष नेतृत्वाने पाठ फिरवल्यामुळे आपण नाराज असल्याचही पारकरांनी मान्य केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतील राणेंचे दुसरे विरोधक परशुराम उपरकर यांनाही विधान परिषद उमेदवारीतून डावललं गेलंय त्यामुळे त्यांनी याआधीच सेनेच्या नेतृत्वाकडे आपली उघड नाराजीही व्यक्त केलीय. त्यामुळे काही दिवसांतच उपरकर हेसुध्दा शिवसेनेला रामराम ठोकणार असल्याचं बोललं जातंय. मात्र उपरकरांनी अजूनही आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीचे पत्ते उघडलेले नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी दीड वर्षं होणार्‍या या घडामोडींमुळे राणेंना होणारा सिंधुदुर्गातला राजकीय विरोध आता कमी होताना दिसतो आहे.

close