मुंबईत मेट्रो पुलाचा भाग कोसळला, 2 ठार

September 4, 2012 12:19 PM0 commentsViews: 3

04 सप्टेंबर

मुंबईतील अंधेरी-कुर्ला रोडवर मेट्रो रेल्वे पुलाच्या बांधकामाला अपघात झाला. मुकुंद नर्सिंग हॉस्पिटल जवळ संध्याकाळी 4 च्या सुमारास पुलाचा भाग कोसळला. या अपघात 2 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहे. तसेच पुलाच्या ढिगाराखाली आणखी काही लोकांची अडकण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जखमींना अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी फायरब्रिगेडच्या दोन गाड्या दाखल झाल्या. या अपघात जखमीची ओळख अजून पटू शकली नाही. त्यांनी तातडीनं मदत कार्य सुरु केलं. ऐन संध्याकाळी दुर्घटना झाल्यामुळे अंधेरीत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पण सध्या वाहतूक सुरळीत झालीय.

close