‘भूत’ येतोय परत !

September 4, 2012 12:44 PM0 commentsViews: 8

04 सप्टेंबर

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आता पुन्हा एकदा सगळ्यांना घाबरवायला सज्ज झाला आहे. 'भूत रिटर्न' हा रामूचा पहिला 3 डी सिनेमा येत्या 12 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाचं पोस्टर लाँच नुकतंच करण्यात आलं. 2003 मध्ये रिलीज झालेल्या भूत सिनेमाचा हा सिक्वेल आणि आता या सिक्वेलमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत, मनिषा कोईराला आणि जेडी चक्रवर्थी. हा सिनेमा तामिळ आणि तेलगु भाषेतही रिलीज होणार आहे. 2003 मध्ये 'भूत' सिनेमात अजय देवगण,उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होते.

close