महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका दाखल

September 4, 2012 1:07 PM0 commentsViews: 42

04 सप्टेंबर

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने किरीट सोमय्या आणि अतूल शहा यांनी हायकोर्टात जनयाचिका दाखल केली आहे. छगन भुजबळ, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे गृहसचिव, पोलीस महानिरिक्षक, ऍटीकरप्शनचे महानिरिक्षक, मुंबईचे पोलीस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेक्रेटरी, कंपनी रेजिस्ट्रेशन रेजिस्ट्रार, मुंबईचे जिल्हाधिकारी, नाशिकचे जिल्हाधिकारी, राज्याचे इन्कम टॅक्स आयुक्त, सेबीचे अध्यक्ष, एसआरएचे सीईओ आणि मीना छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, शेफाली समीर भुजबळ, विशाखा पंकज भुजबळ यांच्या सह 36 जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. अशी माहिती किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.

close