मुंबईत सर्रासपणे मटका सुरूच

September 5, 2012 12:40 PM0 commentsViews: 206

05 सप्टेंबर

मुंबईत 2003 साली मटक्यावर कायम स्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, मुंबईत सर्रास मटका सुरू असल्याचं दिसून येतं आहे. अँण्टॉप हिल परिसरात अनेक ठिकाणी मटक्याचा धंदा सुरू आहे. अँण्टॉप हिल परिसरात मोठ्या प्रमाणात सरदारनगर 2 मधल्या विजय नगरात मटका सुरू आहे. मटका घेणार्‍या या लोकांकडे मटका लावण्यासाठी लोकांची सतत वर्दळ असते. या मटक्याच्या बाजूलाच शाळा आहे. तर दुसरा अड्डा इथल्या सेक्टर पाच मधल्या टायगर वाडीत आहे. भर वस्तीत हे असे अड्डे सुरू आहेत. मटक्याच्या या अड्‌ड्यांवर पोलीस स्टेशन पोसली जातात, असा आरोप येथील नागरीक करत आहे. असे गैर धंदे बंद करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेत. पण या आदेशाकडे अँण्टॉप हिल पोलीस स्टेशनचे अधिकारी दुर्लक्ष करता असल्याचं अरुण पनीकर यांचं म्हणणं आहे.

close