पेट्रोल,डिझेल महागणार ?

September 4, 2012 2:48 PM0 commentsViews: 39

04 सप्टेंबर

महागाईमुळे होरपाळणार्‍या सर्वसामान्य जनतेला या आठवड्यात आणखी 'चटका' बसणार आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस या आठवड्यात महागण्याची शक्यता आहे. इंधनासाठी सबसिडी द्यायला पैसा नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलंय अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने दिली आहे. त्यामुळे दरवाढ अटळ असल्याचं समजतंय. संसदेचं पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संपत आहे. त्यानंतर ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत पेट्रोलचे दर वारंवार वाढले आहे. पण, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती जून 2011 पासून वाढल्याच नाहीत. डिझेल आणि घरगुती गॅसच्या विक्रीवर सरकारी कंपन्यांना दररोज 560 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.

Follow on 'GREAT BHET' twitter

close