जळगावमध्ये डेंग्यूसदृश आजाराने 6 मुलांचा मृत्यू

September 5, 2012 2:30 PM0 commentsViews: 6

05 सप्टेंबर

जळगाव शहरातल्या पिंप्राळा हुडको परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे डेंग्यूसदृश्यं आजार पसरले आहे. 6 बालकांचा डेंग्युसदृश आजाराने मृत्यू झाला आहे. यानंतर आरोग्य विभागाने 16 जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ वायरॉलॉजी इथं पाठवले होते. त्यापैकी 3 जणांना डेंग्यू असल्याचा अहवाल आज महापालिका आरोग्य मिळाला आहे. याची ताबतोब खबरदारी घेत जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी डेंग्यूला अटकाव करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले. पण 6 मुलांच्या मृत्यूनंतर ढिम्म प्रशासनाला एवढ्या उशीरा का जाग आली ? असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहे.

close