पुण्यात पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणार्थीची आत्महत्या

September 4, 2012 5:12 PM0 commentsViews: 3

04 सप्टेंबर

पुण्यात पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील देविदास पुंजीरवार असं या कर्माचार्‍याचं नाव आहे. मुख्यालयातील झाडाला गळफास लावून त्यानं आत्महत्या केली. आत्महत्येमागचे निश्चित कारण अजून समजू शकलं नसलं तरी प्रशिक्षणादरम्यान वरिष्ठ अधिकार्‍यांकडून होणार्‍या मानसिक छळाला कंटाळून त्यानं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्थानकात दोन पोलीस कर्माचार्‍यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

close