पिंपरीत अनधिकृत नळ जोडणी केल्यास फौजदारी गुन्हा

September 5, 2012 4:33 PM0 commentsViews: 12

05 सप्टेंबर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत यापुढे अनधिकृत नळ जोडणी केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंची चोरी केल्याच्या आरोपावरुन हा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असही त्यांनी सांगितलं आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मात्र तीन महिन्यांनी होणार आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांनी अधिकृत नळ जोडणी करुन घेऊन त्यांच्याकडे असलेली थकीत पाणीपट्टी भरल्यास त्यांना अभय योजने अंर्तगत सुमारे 40 टक्क्यांपर्यंत थकीत बिलातील दंड माफ केला जाणार असल्याचा निर्णयही आज घेण्यात आला आहे.

close